WhatsApp Tips: नंबर न सेव्ह करता सहज करता येईल WhatsApp मेसेज, फॉलो करा या स्टेप्स
इंस्टंट मेसेजिंग अँप WhatsApp वर तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह न करताही समोरी व्यक्तीला सहज मेसेज करू शकता. यामुळे तुमचा प्रोफाइल फोटो, स्टेट्स देखील त्या व्यक्तीला दिसणार नाही. जगभरातील कोट्यावधी लोक चॅटिंगसाठी प्रामुख्याने WhatsApp चा वापर करतात. चॅटिंगपासून ते महत्त्वाच्या फाइल्स, व्हिडिओ पाठवण्यासाठी WhatsApp चा उपयोग होतो. अॅपच्या माध्यमातून मेसेज करण्यासाठी आपण सर्वचजण आधी मोबाइलमध्ये नंबर सेव्ह करत असतो. मात्र, तुम्ही नंबर न सेव्ह करता देखील सहज WhatsApp च्या माध्यमातून मेसेज करू शकता. अनेकदा आपल्याला अनोळखी लोकांना लोकेशन अथवा इतर माहिती WhatsApp च्या माध्यमातून पाठवायची असते. अशा वेळेस आपण त्यांचा नंबर सेव्ह करतो. मात्र, तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून सहज नंबर सेव्ह न करता मेसेज करू शकता. #नंबर सेव्ह न करता असा करू शकता WhatsApp मेसेज सर्वात प्रथम फोनवर वेब ब्राउजर ओपन करा. त्यानंतर http://api.whatsapp.com/send?phone=xxxxxxxxxx या लिंकला एड्रेस बारमध्ये पेस्ट करा. xxxxxxxxxx च्या जागी कंट्री कोड टाकून कॉन्टॅक्ट नंबर एंटर करा. आता फोनमध...